

देश देव मानुन समाजहितार्थ कार्य करणाऱ्या जनसेवा फाऊंडेशन च्या अंध, अपंग कलाकारांच्या संकल्पनेतून या देशविघातक काळात सध्या परिस्थितीत संपूर्ण भारत देश संकटाशी सामना करीत आहे. देश सिमेवर व देशात सुरू असलेल्या कोरोना महामारी युद्धात आम्हा अंध, अपंगांचेही योगदान असावे. आम्ही दिव्यांग असलो तरी आत्मनिर्भर आहोत या उदात्त भावनेने देश सिमेवर लढताना ज्या जवानांनी प्राणाची आहुती दिली आणि भूमीवर कोरोना संकटाशी लढताना कोरोना योध्दयांनी देह अर्पण केला अशा भारत मातेच्या शहिद जवानांना श्रध्दापुर्वक अभिवादन करून जे आजही जीवाची बाजी लावून सिमेवर देश सैनिक व भारत भूमीवर देवदूत व कोरोना योध्दयाच्या रूपात डाँक्टर्स, पोलिस, परिचारिका, सफाई कर्मचारी, अधिकारी व पञकार लढत आहेत,अशा विरपुञांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी जनसेवा संकल्पित तिरंगा लहरायेंगे हे देशभक्ती गीत भारत मातेच्या चरणी समर्पित करीत आहेत, या गीताची रचना व संगित दिव्यांग कलाकार विजय वैती यांनी केली असून संगीत सरफराश खुरेशी व सुरेश वाटवाणी या अंध कलाकारांनी दिले आहे. गीत गायक राहुल मुखर्जी, गायीका शिखा जोशी आणि सहकलाकारांनी स्फूर्ती व प्रेरणादायी देशभक्ती गीत तयार केले असून स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण भारतवासीयांचा उत्साह व नव ऊर्जा देण्याच काम या गीतातून होईल