वसई-विरार : भाजपा वसई-विरार जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी वसई-विरार मधील नागरिकांसाठी ‘भाजपा वसई-विरार घरगुती गणेशदर्शन स्पर्धा’ चे आयोजन केले आहे. स्पर्धेचे स्वरूप प्रथम पारितोषिक 5000 रुपये रोख, द्वितीय पारितोषिक 3000 रुपये रोख, तृतीय पारितोषिक 2000 रुपये रोख व पारितोषिक असे असून प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे आयोजक उत्तम कुमार यांनी सांगितले.
कोरोना काळ असल्याने संपूर्ण स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 9323528198 या क्रमांकावर आपल्या श्रीगणेश सजावट व मूर्तीचा असे दोन फोटो काढून पाठवावे. सोबत आपले संपूर्ण नाव, पत्ता मोबाईल नंबर एकत्र लिहून पाठवावा. या नंबरवर कोणतेही प्रश्न विचारू नयेत. ही स्पर्धा फक्त घरगुती श्रीगणेशसाठी आहे तसेच फक्त वसई-विरार मधील नागरिकांसाठी आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस 1 सप्टेंबर 2020 अनंतचतुर्थी पर्यंत असेल. स्पर्धेचे अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आयोजकांकडे असतील. असे उत्तम कुमार यांनी सांगितले.
स्पर्धेची माहिती देताना उत्तम कुमार यांनी, ही स्पर्धा करण्यामागचा आमचा उद्देश कोरोना, लॉकडाऊन यामुळे नागरिकांमध्ये स्फूर्ती आणण्याचा असून स्पर्धा हे त्याचे फक्त निमित्त आहे. यास्पर्धेत जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे अशी विनंती यावेळी त्यांनी वसई-विरारमधील नागरिकांना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *