मुंबई(गुरुनाथ तिरपणकर)-सध्या कोरोना सारख्या घातक विषाणुने महाराष्ट्रातच नव्हे,संपुर्ण देशात थैमान घातले आहे.याची झळ सर्व सामान्य जनतेला जास्त पोहोचली.अशा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात लालबाग-परेल विभातील सिने नाट्य अभिनेते, दिग्दर्शक,पत्रकार महेश्वर तेटांबे यांनी मार्च पासुन सुरु केलेले सामाजिक कार्य लाॅकडाऊनला पाच महिने झाले तरी अविरतपणे सुरु आहे.त्यांनी आपल्या आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे आणि वैयक्तिक पातळीवर मुंबईतील जवळजवळ २५०च्या वर गरजूंना कीराणा सामानाचे वाटप केले आहे.आपल्या पत्रलेखनाच्या माध्यमातून महेश्वर तेटांबे यांनी नागरी समस्यांना वाचा फोडली आहे. त्यांचे हे कार्य अविरतपणे चालु आहे.अशा या कोरोना काळात लाॅकडाऊनला सामोरे जात असताना कोविड १९च्या पार्श्वभूमीवर नुकतंच बालकलाकार आर्य तेटांबे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून कोणताही गाजावाजा न करता केवळ सोशल डीस्टंसिंगचे भान राखून आपल्या विभागातील सर्व सामान्य व्यक्तींना मास्क, सॅनीटायझर आणि फेसशिल्डचे वाटप केले.महेश्वर तेटांबे यांचा मुलगा आर्य तेटांबे याने मल्लखांब आणि योगा या क्रीडाक्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळविलेले आहे त्याचबरोबर सिने नाट्य क्षेत्रातही आपले वेगळे वलय निर्माण केले आहे. अशा या आर्यचा वाढदिवस कोविड १९च्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गापासुन बचाव व्हावा या हेतुपुरस्सर म्हणुन मास्क, सॅनीटायझर, फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या सामाजिक भावनेने केलेल्या कार्याचे मुंबईत सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *