


काही दिवसांपासून गावदेवी मंदिर ते गोखीवरे हा मुख्य रस्ता मुंबई अहमदाबाद महामार्गावर जोडणारा रस्ता असल्याने ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची, कामगारांची ,तसेच नागरिकांची दररोज वर्दळ सुरू असते.ह्याच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पावसामध्ये पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने मोठं मोठे खड्डे दिसत नाही ह्या मुळे अनेक वाहन चालक तसेच आजारी रुग्णांना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता.
संपूर्ण देशात कोरोना ह्या भयंकर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाउन करण्यात आले होते.
ह्यामुळे अनेकांचे रोजगार , व्यवसाय बंद पडलेले आहे , हाथावरचे पोट असणाऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.त्यांना स्वतः ची व परिवाराची देखभाल करणे खूप अवघड झाले आहे.
आणि ह्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन खराब झाल्यास वाहन दुरुस्ती करण्यासाठी लागणारा पैसा जमवणे खूप म्हणजे खूप अवघड झाले आहे .ह्या खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण तसेच वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.
ह्या सर्व गोष्टींचा दिलासा मिळावा म्हणून अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांची सातत्याने प्रश्नाकडे पाठपुरावा सुरू होता त्या अनुषंगाने सातीवलि ते गावदेवी मंदिर पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात सुरुवात झाली आहे.