
मीरा-भाईंदर (प्रतिनिधी):कोविड चा प्रादुर्भाव देशभर वाढत असताना, केंद्र सरकारचे जेईई नीट च्या प्रवेश परिक्षांबाबतचे धोरण आडमुठे पणाचे आहे, असा ठपका ठेवत जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वात मिरा भाईंदर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी ने अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर निषेध प्रदर्शन केले. याप्रसंगी अप्पर तहसीलदार महोदयांद्वारे केंद्र सरकार ला संबोधित करणारे निवेदन पत्र ही देण्यात आले. गटनेते झुबेर इनामदार, उपाध्यक्ष केशलाल यादव आणि इतर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते हिरीरीने प्रदर्शनात उपस्थित होते.
देशभर विद्यार्थी टाहो फोडून परीक्षा पुढे ढकलावे असे केंद्र सरकार ला विनवत असताना काँग्रेस च्या वतीने देशव्यापी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. मिरा भाईंदर मध्ये सदर प्रदर्शनासोबत मिरा भाईंदर युवक काँग्रेस चस अध्यक्ष दीप काकडे यांच्या नेतृत्वात जागोजागी, परीक्षा पुढे ढकलण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. २८ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट असे तीन दिवस ही स्वाक्षरी मोहीम मिरा भाईंदर च्या कानाकोपऱ्यात राबवली जाईल. जेणेकरून नागरिकांच्या भावना आणि त्यांचा पाठींबा विद्यार्थ्यांसाठी उभा राहील व यातूनच झोपलेलं सरकार जाग होईल असे प्रतिपादन दीप काकडे यांनी केले.