
प्रतिनिधी : दिन दयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत शहर अभियान व्यवस्थापक म्हणून वसई विरार शहर महानगर पालिकेत कार्यरत विभा जाधव यांची बृहन्मुंबई महानगर पालिकेत बदली झाली आहे. 10 ऑगस्ट रोजी बदलीचे आदेश आले. मात्र अद्याप ही त्यांनी वसई विरार शहर महानगर कार्यालयातील आपला पदभार सोडलेला नाही.
दिन दयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत शहर अभियान व्यवस्थापक म्हणून वसई विरार शहर महानगर पालिकेत विभा जाधव कार्यरत आहेत. त्यांच्या बदलीचे आदेश दि. 10 ऑगस्ट 2020 रोजी आले आहेत. त्यांची बदली बृहन्मुंबई महानगर पालिकेत करण्यात आलेली आहे. मात्र त्यांनी वसई विरार शहर महानगर पालिकेतील पदभार सोडलेला नाही. वसई विरार शहर महानगर पालिकेत कर्तव्य बजावत असताना त्यांनी प्रचंड काळी माया जमविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सदर बाबत शासनाने त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी युवा शक्ती एक्सप्रेसने केली आहे.

