

प्रतिनिधी महेश्वर तेटांबे यांसकडून
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षांत घेता सोशल डिस्टन्स हा एक महत्वाचा भाग बनला आहे आणि याच पार्श्वभूमीवर संस्थापक अभिजित खरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या
लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन , भारत या संस्थेच्या माध्यमातून मुंबई शाखेतील पदाधिकारी यांचे चर्चासत्र
शनिवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथील प्रसिद्ध राशी स्टुडिओ, करिरोड येथे संपन्न झाले. या चर्चासत्रात कलाकार , तंत्रज्ञ, बँकस्टेज कलाकार यांच्यावर होणारा अन्याय, त्यांच्या समस्या, यांचे निवारण कशाप्रकारे करू शकतो या संदर्भात साधकबाधक चर्चा झाली.त्याचप्रमाणे ज्येष्ठ कलावंताना पेन्शन योजना चालू करणे, त्यांच्यासाठी वृद्धाश्रम उभारणीसाठी प्रयत्न करणे, कलावंतांच्या आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करणे आणि नवनवीन उपक्रम राबविणे यासंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले.याप्रसंगी लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन,भारत .,
गणेश तळेकर – मुंबई जिल्हा अध्यक्ष,
डॉ प्रेमसागर बैरागी सर – उपाध्यक्ष,
रश्मी शहा – उपाध्यक्ष – (संचालिका रश्मी कला ऍक्टींग अकँडमी), दत्तात्रय (आबा) पेडणेकर – (निर्माता – रसिका कला थिएटर आणि रसिका कला अकँडमी) – सचिव, वीणा शिखरे (अभिनेत्री) – सहसचिव,
शितल माने (राशी स्टुडिओ संचालिका आणि नृत्य दिग्दर्शिका) – तक्रार निवारण प्रमुख , राकेश शेळके (वास्तू तज्ज्ञ आणि कला दिग्दर्शक) – तक्रार निवारण उपप्रमुख , सुहास रुके (अभिनेता) – तक्रार निवारण उपप्रमुख , राहुल (साईराज) किशोर मौजे – (दिग्दर्शक) – जनसंपर्क प्रमुख,
महेश भिकाजी तेटांबे (दिग्दर्शक-पत्रकार), मिनल घाग (समाजसेविका) – जनसंपर्क उपप्रमुख…आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. तसेच या चर्चासत्रात कलाकारांच्या ज्या काही समस्या किंवा अडचणी असतील तर त्यासाठी त्यांनी मुंबई कार्यालय राशी स्टुडिओ, माने वखार, त्रिवेणी सदन, करिरोड, लालबाग, मुंबई 12 याठिकाणी वेळ 11 ते 5 यावेळेत राहुल किशोर मौजे – संपर्क प्रमुख मुंबई जिल्हा 9137117400 आणि शितल माने – तक्रार निवारण प्रमुख मुंबई जिल्हा 76665 79934 यांच्याशी संपर्क साधणे असेही सर्वानुमते ठरले.त्याचप्रमाणे कलाकारांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या कार्यशील प्रगतीसाठी लोकस्वराज्य संस्था तसेच
मुंबई जिल्ह्यातील पदाधिकारी नेहमीच प्रयत्नशील राहील असाही ठराव या सत्रांत संमत झाला आणि याच अनुषंगानं मुंबई जिल्हा पदाधिकारी यांनी आपआपल्या परीने मतविभाजन केले. तसेच कलावंत, तंत्रज्ञ यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल या दृष्टीने संस्था नक्की सक्षम राहील ,अशीही अध्यक्ष गणेश तळेकर यांनी ग्वाही दिली. अशा तऱ्हेने खेळीमेळीच्या वातावरणात हे चर्चासत्र संपन्न झाले..!