वसई(वार्ताहार) : कोरोना प्रादुर्भाव काळात राज्यशासनाने सुचवलेल्या नियमांअंतर्गत गणेशोत्सव साजरे होत असतानाच वसईचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. अशातच या कोरोना प्रादुर्भाव काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे, परिचारिकेंचे, पोलिस कर्मचार्‍यांचे, अन्नपुरवठा करणारे स्वयंसेवक, गोरक्षक यांचा सन्मान करण्याचा उपक्रम मंडळाच्या संकल्पनेतून साजरा झाला.

वसईचा राजा चे अध्यक्ष श्री निलेश भानुशे यांनी कोरोना योद्ध्यांच्या सत्काराची जबाबदारी स्वीकारुन पालघर जिल्हा खासदार श्री राजेंद्र गावितजी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. तत्पूर्वी आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांनी निवेदनाद्वारे विनंती वजा मागणी करत वविमनपा क्षेत्रातील रुग्णालयाकरीता प्रस्तावित प्रलंबित प्रकल्प विषयाची माहिती खासदारांना दिली. खा राजेंद्रजी गावित यांनी उपस्थित नागरिकांना रुग्णालयांसंबंधीत प्रलंबित प्रकल्पांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य मिळेल असे आश्वस्त केले.

डॉक्टर परिचारिका ईत्यादी कोरोना योद्ध्यांचा सत्कार खासदारांच्या शुभहस्ते करण्यात आला. 11 देशात अन्नपुरवठा करणारी वसईतील रॉबिनहूड संघटनेचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री निलेश तेंडोलकर (शिवसेना, उप जिल्हा प्रमुख) , श्री प्रथमेश राऊत (शिवसेना, शहरप्रमुख ), श्री राहूल पाटील, श्री योगेश भानुशे, श्री मिलींद खानोलकर इ पदाधिकारी व वसईचा राजा चे कार्यकर्ते राहूलजी भाडांरकर, मयंक ठक्कर, दिनेश गुप्ता,विरेंद्र यादव यांची उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *