
नालासोपारा(प्रतिनिधी):- सध्या देशात कोरोना संक्रमण महामारीच्या काळ हा काही कमी होतांना दिसत नाही.सुमारे ६ महिन्यापासून जनता लॉकडाउन च्या विळख्यात अडकल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे.रोजगार धंदे अद्याप बंद असल्याने व लोकल सेवा.परिवहन सेवा ठप्प राहिल्याने आपला परिवाराचा उदरनिर्वाह कशा करायचा हा प्रश्न आता प्रत्येकासमोर उभा आहे.मूलभूत गरजा पुरवण्यात आता शासकीय व निमशासकीय यंत्रणा देखील अपुऱ्या पडल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे.ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नालासोपारा शहरातील जनतेसाठी मदतीचा एक हात पुढे केला आहे..मनसेचे नालासोपारा शहरसचिव श्री.राज नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली आचोले विभाग अध्यक्ष संतोष परब यांच्या नियोजनातून वार्ड क्रमांक ८२ चे शाखाअध्यक्ष संतोष गुरव तर महिला शाखाअध्यक्ष सौ.सुनीता राठोड यांच्या माध्यमातून अल्कापुरी परिसरातील १०१ गरजू व्यक्तींना सोशल डिस्टसिंगचे अंतर ठेवून मोफत अन्नधान्य व मास्कचे वाटप करण्यात आले.नालासोपारा शहराची लोक संख्या ही प्रचंड असून लोक हलाखीचे जीवन जगतायेत.सर्वच गोष्टी शासन यंत्रणेवर अवलंबून असू नये.माणुसकीच्या दृष्टीकोनातून समाजसेवक तसे इतर सामाजिक संस्थानी दानशूर व्यक्तींनी आपआपल्या परिसरात असा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपावी.असे आवाहन करीत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन कुठलीही सत्ता नसतांना आमचे सामान्य पदाधिकारी हे तळागाळातील जनतेला न्याय देण्यासाठी अहोरात्र झटतायेत तसेच एका नगरसेवकाला लाजवेल असे काम या शहरात करतायेत या शब्दांत शहरसचिव राज नागरे यांनी आपल्या सहका ऱ्याचें कौतुक केले. तसेच आमच्या उपक्रमाचे वृत्त सातत्याने जे लोकप्रिय वृत्तपत्र लोकांसमोर ठेवतायेत अशांचा कायम ऋणी असल्याचे ते म्हणाले.यावेळी सैनिक मांगले.अमेय डावरे.सागर तांबे.मीनल डावरे.वैशाली शिंदे.राकेश पवार.दिनेश गुरव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.