

वसई : भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या माध्यमातून कोरोनाकाळातील मागील 3 ते 4 महिन्यात झालेल्या कामाच्या कार्यअहवालाचे आज राज्याचे एकमेव यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी प्रकाशन पार पडले.
यावेळी उत्तम कुमार यांनी देवेंद्रजी फडणवीस यांचा शाल व श्री पद्मनाभम स्वामी मंदिरातून पूजा करून आणलेली प्रतिमा भेट म्हणून दिली. ‘प्रयत्न मदतीचा माणुसकीचा’ या कोरोना काळात उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाकडून वसई तालुक्यात केलेल्या मदतीच्या कार्यअहवालाचे प्रकाशन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन केले तसेच कार्यअहवालावर आपली स्वाक्षरी दिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उत्तम कुमार यांचे कौतुक करताना, पुढेही असेच काम करत रहा माझा तुम्हाला पाठिंबा आहे. वसई-विरारमध्ये पक्षाचे संघटन मजबूत करा असे ते म्हणाले.
उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, आपले फक्त शुभेच्छारुपी आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. बाकी मला काही नको असे म्हणून त्यांचे आशीर्वाद घेतले.
उत्तम कुमार यांनी यावेळी माहिती देताना भाजपा इंडस्ट्रीयल सेलचे ज्योतिष नांबियर, रितेश सत्यनाथ, विशाल अग्रवाल, गुरू प्रकाश तसेच सहकार्य केलेल्या व मदत केलेल्या दानशूर व्यक्तींची माहिती देवेंद्रजी यांना दिली.