वसई विरार शहर महानगरपालिका सदस्यांची मुदत मागील २८ जून २०२० रोजी संपली असून सध्या महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहेत. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मार्च २०२० मध्ये प्रभागांच्या रचना व आरक्षण सोडत घेण्यात आली होती. प्रभाग रचना व आरक्षण सोडतीबाबत नागरिकांकडून काही हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या, परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यावर सुनावणी झाली नव्हती. याअनुषंगाने नागरिकांकडून आलेल्या हरकतींची सुनावणी दि.११/०९/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय, विरार येथील स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. सदर सुनावणी मा.श्री.संजय मीना, अप्पर आदिवासी आयुक्त, मा.श्री.गंगाथरण डी., आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका, मा.श्री.अविनाश सणस, उप-आयुक्त राज्य निवडणूक आयोग, मा.श्री.अतुल जाधव, अवर सचिव, मा.विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी श्री.पंकज देवरे, उप-आयुक्त (पुनर्वसन) कोकण भवन, मा.जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी श्री.संदीप कळंबे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पालघर यांच्या उपस्थितीत पार पडली. सदर सुनावणीच्या वेळी प्राप्त झालेल्या एकूण १७ हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *