

महापालीकेच्या प्रभाग समिती (अ)वर २२ सप्टेंबर रोजी लाल बावट्याचा मोर्च्याचे आव्हान ?
विरार (प्रतिनिधी) विविध मागणीच्या पुर्ततेसाठी लाल बावट्याने येत्या मंगळवार २२ सप्टेंबर रोजी हंडा व टमरेल मोर्चा काढू असा इशारा आज महानगर पालिकेच्या प्रभाग समिती (अ) येथील उपअभियंता प्रदीप पांचंगे यांना लेखी निवेदना मार्फत दिले. लाल बावट्याचे शिष्टमंडळ आज विविध मागण्यांचे निवेदन घेऊन महापालीकेच्या प्रभाग समिती अ च्या कार्यालयात गेले होते.२२सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्याच्या तयारीत लाल बावटा लागला आहे.निवेदनात माडंलेल्या मागणी वर प्रदीप पाचंगे व लाल बावट्याचे शिष्टमंडळ यांच्यात सकारात्मक पणे चर्चा पार पडली .मोर्चा काढू नये म्हणून प्रदीप पाचंगे ह्यांच्या कडून विनंती करण्यात आली.
आमच्या मागण्या मान्यं करा व त्या लवकरात लवकर पुर्ण करा.असे लेखी आश्वांसन द्या तरच मोर्चा थांबऊ अन्यंथा जनतेच्या मोर्चाला उत्तर देण्यास सामोरे जा असा इशारा लाल बावट्या कडून काँम्रेड शेरू वाघ ह्यांनी दिला.मागण्या १.दिवलई पाड्यात तात्काळ पिण्याचे पाणी पोहोचवा.
२.आगाशी धोबीतलाव येथील सार्वजणिक सौचालय तात्काळ बाधा.
३.उमराळा येथील आदिवासी कुटूबांचे नावी असलेली घरपट्टी अचानक पणे बिगर आदिवासींच्या नावी करण्यात आले आहे.त्या घरपट्या पुन्हा मुळ आदिवासींच्या नावे करा.
४.उमराळा येथे राहत असलेल्या आदिवासी कुटूबांना पिण्याच्या पाण्याचे कनेक्षण पोहोचवा.
५.दिवलई पाड्यात रोड लाईट लावा
अश्या विविध मागण्याचे लेखी निवेदन गेल्या दोन वर्षा पासुन संघटना माह पालिकेला देत आली आहे.त्याचा पाठ पुरावा करत आली आहे.मात्र ह्यावर कार्यकर्त्याच्या तोंडाला फक्त आश्वासनाची पान पुसण्याचे काम इथले अधीकारी करत आहेत.म्हणून लाल बावट्याच्या कार्यकर्त्यानी २२ सप्टेंबर रोजी हंडा व टमरेल मोर्च्याचे निर्धार केले आहेत.मोर्चासाठी जमण्याचे ठीकाण बोळीज खारोडी नाका.सकाळी १० वाजता मंगलवार दिनांक २२ सप्टेंबर २०२०रोजी मोर्चात सामील होताना दिवळई पाड्यातील कार्यकर्त्यांनी पाण्याचे रिकामि हंडे घेउन या व धोबीतलाव च्या कार्यकर्त्यांनी टमरेल घेउन या असे आव्हान लाल बावट्याचे काँम्रेड शेरू वाघ ह्यांनी केले आहे.आज मोर्चा संदर्भात पुर्व कल्पना देत असताना काँम्रेड शेरू वाघ.विमल खाणे.अंजू ठाकरे.सुशिला.दुबळी.कैलास लाखात.प्राजक्ता पागी.सरिता दुबळी.गीता दुबळी.गीता रजपुत.निकीता दूबळी.असे लाल बावट्याचे शिष्टमंळ उपस्थित होते