वसई(अशोक वाघमारे):वसई पश्चिमेस वसई सनसिटी ते नालासोपाऱ्याला जोडणारा घास रोड आहे. ह्याच रोडवर वसई विरार महापालिकेचे वसईतिला नागरिकांसाठी एक सुंदर असे गार्डन आहे. ह्या गार्डनमध्ये वसई शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. त्याच बरोबर हा रस्ता शहरातुन बाहेर असल्याने मोकळा स्वास घेण्यासाठी नागरिक सकाळ संध्याकाळ वॉक करण्यासाठी याच मार्गाचा वापर करताना दिसतात. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मिठागराची मोकळी जागा असल्याने येथे शुद्ध हवा असते. आणि पावसाळ्यात तर ह्या मार्गाच्या दोन्ही बाबाजूला रस्त्याच्या काठोकाठ पाणी भरलेले असते. या कारणास्तव इथे वसईतील नागरिक या सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेत असतात. मात्र आत्ता ह्या मार्गावरील सौंदर्याला असभ्य नागरिकांचीच नजर लागलेली आहे. इथे आज रस्त्याच्या दुतर्फा घाणीचे साम्राज्य उभे राहिलेले दिसत आहे. काही असभ्य नागरिकांच्या अमानवी वर्तनातून केर कचऱ्याबरोबर ड्रेबीज टाकण्याचे काम सुरू आहे. ह्या अश्या कृत्याने घास रस्त्याचे सौंदर्य मात्र धोक्यात आलेले पहावयास मिळाले. रस्त्यावर पसरलेली ही घाण पाहून
नागरिकांनमध्ये मोठी नाराजी पसलेली आहे. नागरिकांच्या मते शहरात शुद्ध हवा घेण्यासाठी हे एकमात्र ठिकाण आहे. तरी महानगरपालिकेने हे ठिकाण अबाधित ठेवावे. व अश्या नागरिकांवर वसई विरार महानगरपालिकेने वेळीच लक्ष घालून कडक कारवाई करावी आणि ह्या रस्त्याचे सौंदर्य शाबूत ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed