वसई(प्रतिनिधी)-लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा बंद असताना फक्त ऑनलाईन शिक्षण शाळा देत आहे म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वी काही शाळांनी वॉट्स एप द्वारे मॅसेज करून पालकांना आपल्या मुलांची सर्वप्रकारची फी भरण्यासाठी सक्ती केलेली आहे त्यासाठी काही पालकांनी सोशिएल मीडियातून व प्रत्यक्ष भेटून सर्व राजकीय पक्ष ,आणि सामाजिक कार्यकर्त्याना खासदार ,आमदार,पत्रकार ह्यांना ह्या अन्यायकारक फी विरुद्ध आवाज उठवण्यास आवाहन केले होते त्याची दखल घेऊन दि 8 सप्टेंबर रोजी शिवसेना वसई शहर प्रमुख श्री प्रथमेश राऊत ,विभाग प्रमुख राहुल कांबळी, बीजेपी वॉर्ड क्र 103 अध्यक्ष श्री सँमसन आलमेडा आणि कार्यकर्ते ह्यांनी पंचायत समिती सभापती सौ अनुजा पाटील व शिक्षणअधिकारी सौ माधवी तांडेल ह्यांना अन्यायकारक फी संबंधी निवेदन देऊन सदर प्रकरणाची शाळेकडे शहानिशा करून अश्या शाळेवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती
सदर निवेदनाची दखल सभापती पाटील मॅडम व शिक्षण अधिकारी तांडेल मॅडम ह्यांनी घेतली असून ह्या निवेदनात दर्शविलेल्या ज्या वसईतील शाळा फी वसूल करतात त्यांच्या प्रशासनाला पत्र काढून फी वसुलीबाबत चार दिवसात खुलासा करण्यास सांगितला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *