
वसई(प्रतिनिधी)-वारंवार वीज खंडीतच्या प्रकारामुळे नागरीक हैराण झाले आहेत.त्यामुळे महावितरणविरोधात संताप व्यक्त होत आहे. काल मनसेने महावितरणच्या गलथान कारभाराचा मेणबत्ती आंदोलना द्वारे निषेध नोंदवला.नुकतेच वसई विरार मध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.पावसाच्या आगमनाने एकीकडे नागरिक सुखावले असले तरी वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे.आज या प्रकाराबाबत मनसेने पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर धडक देत महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना मेणबत्ती देऊन अनोख्या पध्दतीने महावितरणच्या कारभाराचा निषेध नोंदवला.यावेळी जयेंद्र पाटील, प्रवीण भोईर, विजय मांडवकर,वितेंद्र पाटील,शिवाजी सुळे,रवी कांबळी, प्रफुल्ल ठाकूर, प्रफुल्ल पाटील,मनोहर कदम, हरिश्चंद्र सुर्वे,राज नागरे तसेच असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन महावितरणकडून मनसेच्या शिष्टमंडळास देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून वसई विरार मध्ये शहरी तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडीत होत आहे. वारंवार वीज खंडीत होत असल्याने नागरिकांना रात्र जागून काढवी लागत आहे.शिवाय महावितरणच्या अधिकाऱ्यांची मनमानीही वाढली आहे.तसेच पूर्वसूचना न देता रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.त्यामुळे
नागरिक हवालदिल झाले आहेत.विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडीत होत असल्याने जेष्ठ नागरिक व आजारी रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.अशा प्रकारे नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा विचार करून काल मनसेने महावितरण प्रशासनाला जाब विचारत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
