

मुंबई : मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरुन भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे मुंबईत लावण्यात आले आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून कोरोना रुग्णांना योग्य ती मदत कशी पुरवता येईल व गरीब, मजदूर, बेरोजगार लोकांना कुठल्या प्रकारे मदत करता येईल याकडे आपले लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.परंतू भाजपचे नेते फक्त राजकरण करून राज्याचे मुख्यंमत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर खोटे नाटे आरोप करत आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हणतात उद्धवजी यांचे काम कौतुकास्पद असून मुख्यमंत्र्यांचे योग्य पद्धतीने काम सुरु आहे.आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील म्हणतात मुंबईत धारा 144 लागू करणे योग्य नाही.केंद्र सरकारने 20 लाख कोटीचे आर्थिक तरतूद करून केंद्र शासनाने 90 हजार कोटी रुपये वीजवितरण कंपनीला दिले असे दाखविले आहे परंतू अद्याप देशातील कोणत्याही नागरिकांचे विजेचे बिल माफ करण्यात आलेले नाही त्यामुळे सदरचे 90 हजार कोटी रुपये गेले कुठे याचा जबाब भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी द्यावे असे बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.