लेखन:-कु.रुणाली राजेंद्र पांचाळ.

 

ये मुंबई मेरी जान असं प्रत्येक मुंबईकर अभिमानाने म्हणतो.मुंबई एक स्वप्ननगरी आहे.या स्वप्न नगरीत सारेच आपलं नशीब आजमावण्यासाठी आले.इथल्या प्रत्येकाने या स्वप्न नगरीचा विकास केला.आणि याच बरोबर स्वतःचा ही विकास केला.भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं मुंबई शहर अतिशय वेगाने विस्तारत आहे.माझ्या मते मुंबईच्या जडणघडणीत कोणत्याही एका वर्गाचं योगदान नसून प्रत्येक मुंबईकरांचा त्यात वाटा आहे. मुंबई हे एक अस शहर आहे जिथे प्रत्येक माणूस स्वप्नांच्या शोधात असतो.प्रत्येकाची आपली एक स्वतंत्र दुनिया असते त्यात तो रमलेला असतो.
अलीकडे असा एकही दिवस उगवत नाही की वर्तमान पत्रात काहींना काही निमित्ताने मुंबईच्या गर्दीचा उल्लेख नाही.माणसांच्या गर्दीचा शिव्याशाप देत प्रत्येक मुंबईकर मुंबईतच राहत असतो.मुंबईच्या गर्दिबद्दलची चर्चा जेवढी गर्जत असते,तेवढेच मुंबईत येणारे माणसांचे लोंढेही सतत वाढत असतात.आणि हे सारे पाहून आमची मुंबापुरी मात्र गालातल्या गालात हसत असते.या नगरीला मुंबापुरी नाव मिळाले ते तेथील देवतेच्या मुंबापुरीच्या अधिष्ठानाने.या घाई गर्दीचा शहरात आजही अनेक देवदेवता मोठ्या वैभवाने आपले अधिराज्य गाजवत आहेत. सागरकिनारी उभी असलेली महालक्ष्मी,गाजलेला विश्वविख्यात सिद्धिविनायक,याचबरोबर इतर छोटे मोठे भगवान जागोजागी भेटतात.आज सेसव्वाशे वर्षे झाली तरी मुंबई विद्यापीठ येथे आपला आब राखून आहे.देशातील महान औद्योगिक नगरी हे सन्मानाचे मोरपीस तर मुंबापुरीने आपल्या मस्तकी केव्हाच खोचले आहे.प्रदूषित वातावरण मुंबईच्या कीर्तीला लागलेले गालबोट आहे.खरे पाहता या नगरीचे अंत:करण मोठे उदार सर्वसमावेशक आहे.म्हणून तर येथे सगळ्या जातीचे,सर्व पंथांचे,सगळ्या धर्माचे लोक आनंदाने नांदतात.आज जी काय मुंबई आहे तिला घडवण्यामध्ये सर्वांचां समान वाटा आहे.त्यामुळे वाद न घालता मुंबईचा विकास करणं ही आपली जबाबदारी प्रत्येकाने ओळखली पाहिजे.
जगाच्या कानाकोपऱ्यात माणसे या महापुरीत येतात ती आपलं नशीब आजमावायला.जगातील प्रत्येकाला वाटत आपण एकदा तरी इथे यावं.इथले लोक,इथल्या बस,ट्रेन ची गर्दी पहावी! वडापाव,कटिंग चहा ची मस्त चव घ्यावी. कधीही न थांबणार जगातील एकवटेलेलं शहर म्हणून याच सर्वांना कौतुक हीच मुंबईची कालपर्यंत ची ओळख.नंतर मुंबईत खूप बदल झाले.पिढी बदलली,लोकही बदलले.मुंबईने जुन्यानव्यांना सामावून घेतलं. आपलंस केलं.त्यामुळे मुंबई मात्र स्वतः बदलली. आता मोठ्या इमारती ,सतत वाहणारे उड्डाणपूल,गर्दीने भरलेल्या बसेस,लोकल ट्रेन आणि सतत धावणारी दडपणाखाली जगणारी माणसे.पूर्वी इथे मिलं ,कारखाने होते.म्हणतात ना,जिवंतपणा होता.आजही खुप लोकांना जुन्या मुंबईची आठवण आहे. तरी सुद्धा कलावंतांच्या कलेचीही नगरी,विद्वानांच्या विद्येला वाव देते. आणि व्यापाऱ्यांच्या मालाला न्याय देते.तिची स्वतःची एक भाषा आहे.राज्यभाषा मराठी असो वा संपर्क भाषा हिंदी असो.तिच्यावर मुंबईचा वेगळा ठसा आहे.स्वतंत्र्य व्यक्तिमत्वाने नांदणारी ही मुंबापुरी आहे.मग तिला कुणी मुंबई म्हणो वा बॉम्बे म्हणो ती आहे आमची आगळीवेगळी अशी स्वप्ननगरी  मुंबापुरी….

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *