
प्रतिनिधी : दलित पँथर डहाणू तालुक्याच्या वतीने दि. 3/6/2019 रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब पालघर यांना चिंचणी बुरूज पाडा येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत बाबत प्रत्येक्ष भेट घेऊन आमरण उपोषणाचे निवेदन देण्यात आले होते. त्या संदर्भात मा. उपविभागीय अधिकारी यांनी दि. 10/6/2019 रोजी दलित पँथर संघटनेचे डहाणू तालुका अध्यक्ष विनायक जाधव यांना तातडीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. त्या अनुशंगाने मंगळवार दि. 11/6/2019 रोजी डहाणू येथील प्रांत कार्यालयामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेमध्ये ग्रामसेवक चिंचणी व सरपंच चिंचणी ह्यांनी दलित पँथर संघटनेस लेखी निवेदनद्वारे असे आश्वासन दिले की, 15 दिवसाच्या आत चिंचणी बुरूज पाडा येथील पाण्याचा प्रश्न निकाली काढून पाण्याची व्यवस्था करून देण्यात येईन असे आश्वासन देण्यात आले . त्या संदर्भात डहाणू तालुका अध्यक्ष विनायक जाधव यांनी तूर्तास 12 तारखेचे उपोषण मागे घेण्यात आले असून, 15 दिवसांच्या आत व्यवस्थित पाणी पुरवठा न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण करण्यात येईल . असे ठणकावून सांगून इतिवृत्ता मध्ये नोंद करण्यास सांगितले.
या वेळीस सदर सभेमध्ये मा.भरक्षे साहेब (गटविकास अधिकारी डहाणू ),मा.समद शेख (शिरस्तेदार उपविभागीय कार्यालय डहाणू ), मा.महेंद्र खोडके ( अव्वल कारकून तहसीलदार कार्यालय डहाणू ),मा.आर. आर. कोळी (विस्तार अधिकारी पंचायत समिती डहाणू ), मा.पी. एस. चौधरी (कनिष्ठ अभियंता पंचायत समिती डहाणू ),मा.एन. पी. जाधव (ग्रामविकास अधिकारी चिंचणी),मा.कल्पेश धोडी (सरपंच चिंचणी),मा.रघुनाथ सापळे (पाणी पुरवठा ठेकेदार प्रतिनिधी डहाणू ) हे मान्यवर उपस्थित होते. तसेच दलित पँथर संघटनेचे डहाणू तालुका अध्यक्ष विनायक जाधव,डहाणू तालुका उपाध्यक्ष शिवप्रसाद कांबळे,डहाणू तालुका उपकार्याध्याक्ष किसन गोरखाना, वाणगाव शहर अध्यक्ष जीभाऊ अहीरे, चिंचणी शहर अध्यक्ष किरण गोरखाना, चिंचणी ग्रामपंचायत सदस्य भारती धोडी तसेच चिंचणी बुरूज पाडा येथील ग्रामस्थ व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
