

मुंबई(महेश्वर तेटांबे)-दिवाळी सण मोठा,नाही आनंदाला तोटा या उंक्तीप्रमाणे आपण दीपावली हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो, फटाक्यांची आतिषबाजी , सुवासिक फराळांचा घमघमाट, रंगबिरंगी कंदिलांची आणि दिव्यांची आरास या सर्वानी दीपोत्सव अगदी बहरून जातो. पण सद्यस्थितीचा आढावा घेता सध्या कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूने मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देशात थैमान घातले आहे. क्रित्येक जण या कोरोनाला बळी पडले आहेत आणि अशा परिस्थितीत दीपोत्सव जल्लोषात साजरा न करता केवळ सामाजिक भावना आणि पर्यावरण समतोल म्हणून रा.स्व.सं.- जनकल्याण समिती – परळ भागच्या वतीने परळ विभागातील ६०० गरजू जे घरेलू कामगार आहेत आणि आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल आहेत अशा गरजूना दिवाळी फराळ कीट देण्याचे निश्चित केले आहे आणि यासंबंधीचे चर्चासत्र नुकतेच नागरी विकास परिषद, दत्तकृपा सोसायटी, वोल्टास कंपनी समोर, डॉ.आंबेडकर रोड, मुंबई ४०० ०१२. या ठिकाणी संपन्न झाले. या चर्चासत्रात परळ भाग अध्यक्षा सौ.अनिता मिलिंद सकपाळ यांनी निधी संकलनासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले. तसेच भाग कार्यवाह श्री प्रवीण आंबेरकर यांनी सभासदांना फॉर्म भरून घेण्याचे सूचित केले. त्याचप्रमाणे परळ विभाग कार्यवाह श्री प्रताप शिवराम परब यांनी निधी संकलन व दिवाळी फराळ वाटप कशाप्रकारे करायचे याबाबत उपस्थित सभासदांना विस्तृत असे मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपस्थित सभासदांनी आपापल्या परीने मतविभाजन करून खेळीमेळीच्या वातावरणात हे चर्चासत्र पार पाडले. आणि पसायदानाने सभेतील चर्चासत्राची सांगता करण्यात आली.