
दापोली-(विशाल मोरे/शिवकन्या नम्रता शिरकर)-राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ‘ माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबवण्यात येत आहे.ग्रामीण भागातील कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्थरावर जाऊन आरोग्य विभागाअंतर्गत वाडी वस्तीत होम टु होम गावातील कोविड संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर पुढील उपचार सुरु करणे व गाव कोविड मुक्त करणे हाच या संकल्पनेचा मुख्य हेतु आहे.
आरोग्य विभागाचे कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्फत प्लस ऑक्सिमिटर व थर्मल तापमानमापक उपकरणे वापरुन कोरोना चाचणी संकल्पना खेडोपाड्यातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत राबविली जात आहे.
दाभीळ गावातील मोहल्ला, भोईवाडी,बौद्धवाडी, तेलीवाडी, सालीवाडी, सुतारवाडी,पाटिलवाडी, डांबुकवाडी,मोरेवाडी व तांबेवाडी या दहा वाड्यांमध्ये सदर मोहीम यशस्वीरीत्या पार पडली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन,सोशल डिस्टन्सिंग, मास्क,हँडवॉश, सेनिटाईझर नियमित वापरावे याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती दिली.
शासनाच्या सदर उपक्रमाला गावातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे आरोग्य सेविका शोभाताई पाटील यांनी सांगितले आहे.