

दापोली,रत्नागिरी
७२१८४६७९६३
नाही रातीची झोप
डोईवरची मोडतेय खोप
घरीच जो तो भरडला जातोय
सावधान इथे देश विकला जातोय
नोकरीची लागली वाट
मात्र साहेबांचा असे थाट
हातावर जगणारा शकला शोधतोय
सावधान इथे देश विकला जातोय
जगण्याचं उडालं छप्पर
नोकऱ्या नाही मात्र भरत्या बंपर
आशेवर राजकरी मुतला जातोय
सावधान इथे देश विकला जातोय
बेरोजगारी षटकार मारते
भ्रष्टाचाराची चौकार लगावते
तरुण अपयशाच्या शृंकला मोजतोय
सावधान इथे देश विकला जातोय
नको ते सुरू आहे चॅलेंज
बुडाखाली दिसत आहे नॉलेज
मी मोदींची कमाल पहायला बसतोय
सावधान इथे देश विकला जातोय
कोणी नाही कोणाचे इथे
गातो फक्त यशाचे गीते
पंधरा लाख स्वप्नात आम्ही पाहतोय
सावधान इथे देश विकला जातोय
प्लिज बस झाले मोदीजी
तो कडू लागतोय जुना पार्लेजी
आमचा शेतकरी ही संपला जातोय
सावधान इथे देश विकला जातोय
वास्तववादी रचना केली आहे….