

◆ वसई-विरार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची मोर्चेबांधणी
वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या येऊन ठेपलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कडून मोठ्याप्रमाणात मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्याकडून भाजपाकडून जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांना बविआचा गड मानल्या जाणाऱ्या विरारच्या भाजपा विरार व वसई पूर्व मंडळाच्या प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
उत्तम कुमार यांनी पदाची जबाबदारी घेत, वसईतील लक्ष्मीधाम गोशाळा येथे भेट देऊन धान्याचे ‘नमो किट’ दिले तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेस वह्या दिल्या. तसेच विरार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास पीपीईकिट, मास्क, सॅनिटायजर आदी वस्तू भेट म्हणून दिल्या.
जबाबदारी दिल्यानंतर उत्तम कुमार यांनी बोलताना त्यांनी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांचे आभार व्यक्त केले. राज्याचे एकमेव यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने वसई-विरार महानगरपालिकेवर नक्कीच भाजपाचा झेंडा फडकेल. असे यावेळी ते म्हणाले.