
पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील खार्डी, खानिवडे या रेती बंदरांवर पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी छापे मारून 7,90,00,350/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंत केलेली ही प्रचंड मोठी ऐतिहासिक कारवाई असल्याचे बोलले जाते.
पालघर जिल्ह्यातील खार्डी, खानिवडे या रेती बंदरांमध्ये रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना मिळत होत्या. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या संरक्षणात सदर गोरखधंदा चालत असल्याचा आरोप केला जात होता. महसूल, पोलीस व वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना मैनेज करूनच रेती माफिया हा गोरखधंदा करतात. पोलीस, महसूल व वाहतूक विभागाची प्रतिमा मलीन होत होती. अखेर दि. 26/9/2020 रोजी पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी खार्डी व खानिवडे रेती बंदरांवर छापे मारून 7,90,00,350/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. खार्डी रेती बंदरातून 74,09,250/- किमतीची 750 ब्रास रेती, 15 लाख रुपये किमतीचा एक जेसीबी, 1,60,00,000/- रुपये किमतीच्या 80 बोटी, 50,00,000/- किमतीचे 50 सक्शन पंप ताब्यात घेण्यात आले. तर खानिवडे रेती बंदरातून 83,97,150/- रुपये किमतीचा 850 ब्रास रेती साठा, 1,02,00,000/- रुपये किमतीचे सक्शन पंप, 3 करोड़ रुपये किमतीच्या 150 बोटी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी विरार पोलीस स्टेशनमध्ये भा. दं. वि. स. क. 379, 34 प्रमाणे गुन्हा नोंदणी क्र. 832/2020 व 833/2020 दाखल करण्यात आले आहेत. पोलीस कारवाई संदर्भात सूचना मिळताच रेती माफिया व तमाम मजूर, बोटी चालक, जेसीबी चालक फरार झाले.
एवढ्या मोठ्या कारवाईत एवढा मोठा फौजफाटा असताना एक ही आरोपी पोलिसांच्या हाती लागू नये याचे आश्चर्य वाटते.
सदर प्रकरणाचा पोलीस तपास कसा होतो ? हे पाहणे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा लाच खाऊन पोलीस यंत्रणा मैनेज होते.
