

दापोली:(विशाल मोरे)- तालुक्यातील मौजे देगांव येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला या वेळी माननिय उपविभागीय कृषी अधिकारी, दापोली श्री. दिपक कुटे साहेब यांनी उपस्थित राहून खतांचा योग्य वापर, सेंद्रिय शेती, एकात्मिक खत व्यवस्थापन,भातावरील किडी यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना याबाबत अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले ,या वेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. उमेश मोहिते साहेब व कृषी पर्यवेक्षक श्री.सुभाष अबगुल साहेब यांनी मार्गदर्शन केले, मृदा आरोग्य पत्रिकेबाबत विषेतज्ञ म्हणून श्री.पी.आर.पार्टे साहेब यानी मार्गदर्शन केले यावेळी कृषी सहाय्यक श्री.अतुल पाटील,श्री. उदय बंगाल,श्री चकोर श्री बाळकृष्ण गोपाळ बारे उपसरपंच, सौ सिया महादेव पुजारी ग्रामसेविका व देगावं येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
