

ठाणे(प्रतिनिधी) – ठाणे महानगरपालिका वागळे इस्टेट प्रभाग समितीच्या अंतर्गत विभागात श्रीनगर येथे काही दुकान मालकांनी जनपथ तसेच जनसामान्यांच्या वापराच्या जागेवर स्वहित साधून अनधिकृत पद्धतीचे बांधकाम केले होते तसेच सदर बांधकामाचा स्थानिक व रहदारी करणाऱ्या जनसामान्य व्यक्तींना त्याबाबतचा त्रास होत असल्याने सदर बाबतीत युवाशक्ती एक्सप्रेसच्या पत्रकार पराग पाटील यांनी वागळे इस्टेट प्रभाग समिती ठाणे महानगरपालिका सह-आयुक्त (अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग) यांच्याशी दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी यामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता सदर अर्जा नुसार पालिका प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेता त्वरित तोडक कारवाई केली सदर बाबतीत पालिका प्रशासन तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे आभार
