मिरा भाईंदर शहरात गेले कित्येक आठवडे पाण्याची समस्या भेडसावत असताना, शहरातील विरोधी पक्ष काँग्रेस च्या नेत्यांनी भाजप वर खोट्या राजकारणाचा आरोप केला आहे. गेले आठवडा भर शहरात पाण्याची समस्या भेडसावत असताना नागरिकांचा आक्रोश वाढला होता. यात महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी सोशल माध्यमावर MIDC कडून आलेले एक पत्र वायरल केले आणि संबोधन केले की midc ने पाणी कपात केल्यामुळे पाणी कमी येत आहे. मात्र ते पत्र नीट वाचले असता त्यात आढळून आले की शहरात केवळ ९० दलली/दिन पाणी एवढेच midc कढुन मंजूर आहे. त्या उपरील २५ mld पाणी हे २०१९ च्या पावसाळ्यात केवळ तात्पुरत्या स्वरूपात मंजूर करण्यात आले होते.

कॉंग्रेस ने आरोप केला आहे की विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजप ने आणि तत्कालीन। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी हे तात्पुरते पाणी परमनन्ट भासवून शहरातील नागरिकांची दिशाभूल केलेली आहे, त्याही उपर भाजप शासित महानगरपालिकेने ह्याच अतिरिक्त पाण्याच्या भरवशावर नवीन नळ जोडणी कनेक्शन ही दिले, आता ना धड त्या नव्या कनेक्शन ना पाणी पुरत आणि नाही जुन्या. यामुळे पाणी वाटप यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे.

मार्च २०२० ला ही अतिरिक्त २५ mld तात्पुरत्या पाण्याची तरतूद रद्द झाली असताना महापौर सप्टेंबर महिन्यात पत्र लिहिण्याचा फार्स करतात म्हणजे ही थट्टा त्यांनाही मान्य आहे. येथे मिरा भाईंदर च्या शहरवासीयांची दिशाभूल झालेली आहे. आणि सत्ताधारी पक्ष आणि संबंधीत अधिकारी यांनी सामान्य नागरिकांना उत्तर देणे बंधनकारक आहे.

शहराच्या हक्काचे पाणी आणण्यासाठी मिरा भाईंदर काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. असे जिल्हाध्यक्ष प्रमोद जयराम सामंत यांनी प्रतिपादन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *