नालासोपारा(प्रतिनिधी) : पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा बडेजाव मिरवीत बैठकांवर बैठका घेणाऱ्या वसई – विरार महापालिकेने शहरातील गटारांची नवीन झाकणे बसविण्यात मात्र कसूर केल्याचे चित्र नालासोपारा शहरात जागोजागी दिसत आहेत.झाकणे बसविली जातात तीही अगदी निष्कृठ दर्जाची अगदी सहा महिन्यातभरातच झाकणाची वाताहात होते नालासोपारा शहरातील अनेक भागांमधील गटारांची (मॅनहोल्स) झाकणे तुटलेल्या अवस्थेत असतात त्यामुळे मुसळधार पावसात पाणी तुंबल्यास अपघातजन्य परिस्थिती ओढविण्याची भीती नेहमी व्यक्त होत असते ..महानगरपालिकेची कामेही त्यांच्या वारंवार निदर्शनास आणून द्यावी लागतात ..त्यातही २-२ महिन्यांचा कालावधी निघून जातो

नालासोपारा संख्येश्वर वार्ड क्रमांक ७० मधील वैतीवाडी परिसरातील सर्वेश्वरी सोसायटीलगत रहदारीच्या मुख्य रस्त्याची गटावरील तब्बल १२ गटारांची झाकणे गेल्या दोन महिन्याभरापासून तुटलेल्या अवस्थेत होती मनविसे शहरसचिव सागर तुर्डे यांनी अनेकदा संबंधित विभाग कंत्राटदाराशी संपर्क करून काम उपरोक्त काम करावे अशी विनंती केली..आज करतो उद्या करतो अशी उडवाउडवीची उत्तरे देत संपूर्ण दोन उलटून गेले आठवडाभरापूर्वी ६ वर्षांच्या मुलाचा पाय मॅनहोल्स मध्ये अडकून पडला पत्र्याचे झाकण असल्याने त्या लहान मुलाचा पाय अक्षरशः रक्तबंबाळ झाला शेवटी प्रभाग ड संबंधित विभाग अधिकाऱ्यास संपर्क करत दोन दिवसात काम न केल्यास आम्हीच तुमच्या दालनात येऊन बसु सांगताच ..काळ सायंकाळी कंत्राटदाराचा कॉल सायंकाळी सागर तुर्डे यांना समोरून फोन आला उद्या तुमचं काम होऊन जाईल चर्चेदरम्यान अधिक माहिती मिळाली महानगरपालिकेकडून अद्यापही आमचं कित्येक महिन्याच बिलच थकीत आहे त्यामुळे पुढील कामे करता येत नाहीत ..यावरूनच वसई विरार महानगरपालिकेचा बेजबाबदारपना दिसून येतो .असो पण आज झाकणे लागली त्यामुळे परिसरातील राहिवाश्यांचा आनंद द्विगुणित झाला होता तेथील स्थानिकांनी मनसेचे आभार मानले.

त्यांच्याच (महानगरपालिका) कामासाठी पाठपुरावा करून झगडावं लागतंय हेच मोठं दुर्दैव – सागर तुर्डे ( ऩालासोपारा शहरसचिव, मनविसे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *