
वसई(प्रतिनिधी)- वसई विरार महानगरपालिका च्या हद्दीत अनधिकृत बांधकामाची गंगोत्री पैशाला हावरट झालेल्या अधिकारामुळे वाहू लागली आहे. जे अधिकारी भ्रष्टाचाराने पोखरून निघाले आहेत त्यांच्या भ्रष्ट कार्यवाहिनी मागील अकरा वर्षात पालिकेच्या कारभाराचिंच सालटी काढले आहेत पालिकेच्या इभ्रत वेशीवर टांगण्या पर्यंत होत असलेल्या भ्रष्टाचार संधी दर्जाचा एखादा अधिकारी निमूटपणे पाहत उभा असल्याने पालिकेचा कारभार काळवंडला आहे यावर शिक्कामोर्तब झालेले आहे नगर विकास मंत्र्यांनी वसईतील वाढता बांधकामासंदर्भात आयुक्त गंगाधर डी. यांना तंबी दिल्यानंतर आयुक्तांनी वसई विरार मधील तीन प्रभाग समिती अधिकाराच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत मात्र या बदल्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत मात्र या बदल्या करताना भ्रष्टाचाराने अक्षरशः पोखरून निघालेल्या प्रताप कोळी यांच्यासारखा अधिकाऱ्याला पेल्हार विभागानंतर वसई गावचा प्रभाग सोडून आयुक्तांनी बौद्धिक दिवळखोरीचा प्रयत आणून दिला आहे अशी चर्चा वसई विरार मध्ये रंगून आली आहे. या आधी पेल्हार विभागात प्रभारी सह आयुक्त म्हणून कामकाज संभाळणाऱ्या प्रताप कोळीनी पेल्हार विभागात असताना काय दिवे लावले हे आयुक्तांना नव्याने सांगण्याची गरजच काय? प्रताप कोळी सारख्या एका अधीकाऱ्याने पेल्हार विभाग अवैध बांधकामांनी घाणेरडा करून टाकला आहे अनेक वेळा कारवायांसाठी या अधिकाराला अवगत करून देखिल साधा बांधकामावर कारवाई करणाऱ्या प्रताप कोळी वर पुन्हा वसई गावाच्या प्रभारी सह आयुक्तपदी नियुक्त करणे यामध्ये नेमके काय गौडबंगाल आहे. प्रताप कोळी यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर इतके मेहरबान का झालेत? पालिकेत दुसऱ्या अनुभवी आणि अभ्यासू चेहरे नाही का?असा सवाल आता नागरिकांनी केला आहे प्रताप कोळी यांच्यासारख्या वाहत्या गंगोत्री हात धुवून घेणाऱ्या अधिकाऱ्यालाच पुन्हा पुन्हा संधी दिली जात असेल तर प्र.सह आयुक्त प्रताप कोळी आणि आयुक्त गंगाधर डी. यांच्यात काही आर्थिक स्वरूपाचे नाते आहे का? असा आरोप नागरिकांनी केला आहे. पेल्हार विभागातील अनधिकृत बांधकामांनी सत्यानाश लावणाऱ्या प्रताप कोळीची खरंतर चौकशी करून त्यांचे पालिकेतून हकालपट्टी करायला हवी होती. मात्र अधिकार्यांच्या चुकांवर, भ्रष्ट पणावर पांघरून घालून पुन्हा त्या अधिकाऱ्याला अनधिकृत बांधकामाची घाण करण्याचे पुन्हा पुन्हा संधी दिली जाते. या भूमिकेवर नागरिकांनी संशय व्यक्त केला असून आयुक्तांना भले करायचे आहे की पालीकेची वाताहत करायचे आहे. असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अनधिकृत बांधकामामागे फुटा साठी शंभर ते दीडशे रुपये वसुली करणाऱ्या प्रताप कोळीची वसई गाव सारख्या निसर्गसंपन्न भागात बदली करणे म्हणजे येथे भूमाफियाना चालना देऊन निसर्गावर कुऱ्हाड चालविण्यास भूमाफियांना संधी देण्यासारखे आहे, आयुक्तांनी प्रताप कोळीचे नियुक्ती करून वसई गावातील नागरिकांचे भविष्य अंधारात ढकलण्यचे प्रयोजन आखले आहे असा संतप्त सुर आता वसई गाव परिसरातील नागरिकांमधून उमटू लागला आहे नजीकच्या काळात वसई गावकऱ्यांना तुमच्या परिसरात अनधिकृत बांधकामाची गंगोत्री व्हायला लागण्याचा धोका आहे वेळीच सावध व्हा. असा इशारा सुज्ञ वर्गातून दिला जात आहे.
