वसई(प्रतिनिधी) वसईतील वीज ग्राहकांनी त्यांच्या अनेक तक्रारी उपकार्यकारी अभियंता वसई नागरी यांचा सहज सर्व संबंधित कार्यालयात दाखल केलेल्या आहेत बराच कालावधी उलटून गेला तरी सदरहू कार्यालयातून दाद मिळत नाही असे लक्षात आल्यावर संबंधित वीज ग्राहकांनी मी वसईकर अभियान या वसईकराच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमच्या संघटनेकडेही सदरहू तक्रारी दाखल केल्या.
सदरहू तक्रारीबाबत उपकार्यकारी अभियंता वसई (नागरी) यांच्यासह सर्व संबंधित कार्यालय ई मेलद्वारे संघटनेने पाठपुरावा करून देखील उपकार्यकारी अभियंता वसई(नागरी) श्री महेश माधवी यांच्याकडून सदरहू प्रश्नाबाबत कोणताही संवाद अथवा लेखी उत्तर ना संबधीत ग्राहकास ना संस्थेस प्राप्त झालेले आहे. लॉकडाऊन च्या कालावधीत ग्राहकांच्या वीज बिलाचे समाधानकारक निराकरण करण्याऐवजी उडवा उडवीचे उत्तरे देण्याचे काम सदरहू अधिकाऱ्याने केलेले आहे.ग्राहकांप्रति संबधीत शासकीय अधिकाऱ्याची असंवेदनशीलता व अकार्यक्षमता लक्षात घेता वसईकर वीज ग्राहकाकडून त्यांच्या सह्याद्वारे त्यांच्या प्रत्यक्ष सहभाग घेऊन श्री महेश माधवी यांच्या हक्कालपट्टीचा लोकप्रस्ताव तयार करण्याचा कार्यक्रम बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी उपकार्यकारी अभियंता वसई(नागरी)यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन व स्वाक्षरी मोहीम अशा स्वरूपाच्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येईल हे कोविड-19ची पाश्वभूमी लक्षात घेता सोशल डिस्टनिंगचे पालन करून धरणे आंदोलन व स्वाक्षरी मोहीम सकाळी 10 वाजता ते 1 वाजेपर्यंत करण्यात येईल असे मी वसई कर अभियानचे कार्यकारी अध्यक्ष ऍड.सुमित डोंगरे यांनी आपल्या परिपत्रकात लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *