

ठाणे (प्रतिनिधी)-ठाणे महानगरपालिका हद्दीत वागळे इस्टेट रोड नंबर-22 येथील नाल्यावरील सुरू असलेल्या पुलाच्या बांधकाम संदर्भात युवाशक्ती एक्सप्रेस चे प्रतिनिधी रितेश सिंग यांनी वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणुन देखील सदर बांधकाम अपूर्ण स्वरूपाचे सोडण्यात आलेले आहे, नाल्यावरील पूल खूप पूर्वी बनविला गेला आहे, वास्तविक एक वर्षा पेक्षा जास्त काळ झाला आहे परंतु पुलाला वापरल्या जाणाऱ्या लोखंडी रॉड (सळई) हे धोकादायक स्थितीत सोडले आहे.
अशा परिस्थीतित नाल्याच्या बांधकामामुळे परिसरातील रहिवाशांचे जीवन व मालमत्तेस मोठा धोका आहे कोणालाही गंभीर इजा होऊ शकते या प्राणघातक परिणाम घडू शकतो,त्याशिवाय रस्ते अपघाताचे प्रमाण वाढू शकते दरवर्षी लाखों लोक रस्ते अपघातात मृत्यू पावतात.
ठाणे महानगरपालिका संबधीत विभागाच्या कार्य पद्धतीवर तसेच कामकाजा बाबत प्रश्न चिन्ह उभे आहे. रस्त्यावर लोखंडी सळई धोक्या स्थितीत सोडले जातात, कंत्राटदार वर तपासणी अधिकारी पाळत ठेवण्यात अपयशी ठरतात त्यासाठी त्यां कंत्राटदाराला अपूर्ण काम केल्याबाबत आजपर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही.
त्यामुळे तक्रार दाखल करून देखील ठाणे महानगरपालिका तसेच वागळे प्रभाग समिती यांनी त्वरित सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेता कारवाई करावी अशी अपेक्षा स्थानिक तसेच रहदारी करणाऱ्या जनसामान्यांकडून होत आहे. जे लोक नियमाकडे दुर्लक्ष करतात आणि मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास देतात त्यांच्यावर वेळेवर कारवाई केल्याने सर्वसामान्यांचा विश्वास परत मिळेल अशी अपेक्षा आहे.
