
दापोली(विशाल मोरे):तालुक्यातील अनेक गावामंध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असून शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. प्रदीर्घ विश्रांती नंतर अवकाळी सुरु झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने भातशेती,नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून वर्षभर रक्ताचे पाणी केलेल्या शेतकरी राजाच्या मुखातला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. कोरोना काळात आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी राजासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आता उभा राहिला आहे.
परतीच्या पावसाने महाराष्ट्रात सर्वत्र शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतातील मातीसोबत पिकेही वाहून गेली आहेत. सरकारने त्वरित पंचनामे करण्यात वेळ न घालवता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी बळीराजा व विविध सेवाभावी संस्थाकडून होत आहे.