

वसई (प्रतिनिधी) : प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये खाजगी व्यक्ती तो जणू सरकारी कर्मचारी असल्याच्या थाटात काम करताना दिसतो. शासकीय कार्यालयात खाजगी व्यक्तींना कामास न ठेवण्याबाबत शासनाचे परिपत्रक असताना सर्वत्र शासकीय कार्यालयांमध्ये आज ही खुल्लमखुल्ला खाजगी व्यक्ती शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वावरताना दिसतात.
वसई तहसीलदार कार्यालयात बसणाऱ्या व सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे काम करीत असणाऱ्या खाजगी व्यक्तींवर कारवाई करण्यासंदर्भात युवा शक्ती एक्सप्रेसने दि. 4/3/2020 रोजी तहसीलदार वसई यांना पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र सदर प्रकरणी तत्कालीन तहसीलदार किरण सुरवसे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. कारवाई का केली नाही याबाबत किरण सुरवसे यांची चौकशी व्हावी, अशी मागणी युवा शक्ती एक्सप्रेसने केली आहे.
या संदर्भात युवा शक्ती एक्सप्रेसने नव्याने पदभार स्वीकारलेल्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्याकडे कारवाईसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. उज्ज्वला भगत खाजगीत बोलून दाखवतात की, शासकीय कार्यालयांमध्ये जे खाजगी कर्मचारी काम करतात ते चुकीचे आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या लिखीत आदेशानंतर ही कारवाई होत नाही.
कारवाई करावीच लागेल! कामे करण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे खाजगी व्यक्ती कामाला ठेऊन आम्ही कामे करून घेतो, असे अधिकारी सांगतात. अधिकाऱ्यांचे हे वर्तन बेकायदा आहे. वर्षानुवर्ष हे प्रकार चालू आहेत. हे खाजगी कर्मचारी महत्वाची शासकीय कागदपत्रे हाताळताना दिसतात. खाजगी लोकांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे कामावर ठेऊन त्यांना संरक्षण देणे हे अधिकारी अडचणीत येणार ? हे त्यांनी ध्यानात ठेवावे. तरी शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी लोकांना त्वरित काढून टाकावे..
तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी कारवाई न केल्यास कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्याकरिता मुख्यमंत्री व तमाम वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या जातील. कायद्याची काटेकोरपणे अंमल बजावणी व्हायलाच हवी. ढिसाळपणा व कोणीही अधिकारी कर्मचारी उद्धटपणा व मनमानी करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही. हे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ध्यानात ठेवावे.