रविवार दिनांक १६ जून २०१९ रोजी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ३४ अनाथ मुलांना संगणक, दप्तर, पादत्राणे, वह्या, पेन, पेंसील, खोडरबर, फळा, ॲटलास बूक, शब्दकोष इत्यादि शैक्षणिक साहित्य ॲड.तेजश्री राणे, दिपस्वीनी कोरगावकर, प्रणव जोशी, अपर्णा आफळे, सायबा समूह, रुग्णमित्र संस्था, आमची वसई सामाजिक संस्था , धर्मसभा, ब्राह्मण उत्कर्ष मंडळ यांच्या तर्फे वितरीत करण्यात आले.

“ज्ञानदीप तेवत ठेवून सगळ्यांनी विविध क्षेत्रात शिखरे गाठावी व गोब्राह्मण प्रतिपालक – शेतकऱ्यांचे तारणहार व रयतेचे पोषक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श स्वत:पुढे ठेवत समाज, राजनिती, न्याय व वाणिज्य क्षेत्रात कार्यरत रहावे” असा उपदेश पं. हृषीकेश वैद्य गुरुजींनी सर्व उपस्थितांना केला. उपस्थीत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला.आमची वसई अध्यक्ष पं. हृषीकेश वैद्य यांच्या जन्मदिना निमित्त आमची वसई सदस्यांनी सगळ्यांना खाउ चे वाटप केले. वंदेमातरम् गायनाने मोहिमेची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *