“महात्मा फुले जनआरोग्य योजनेत हृदय रोग शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध झाली.”

प्रतिनिधी – पालघर जिल्हा कुपोषणाने ग्रस्त जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो अशातच येथे अद्यावत सुविधा असलेल्या रुग्णालयांची वानवा असल्याने गरीब-गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी वसई किंवा मुंबईत जाव लागत. शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते अशातच या कोरोना प्रादुर्भाव काळात सरकारी रुग्णालयात जाणे शक्य होत नाही.

बोईसर येथील रहिवासी श्री तुळशीदास भोईर यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला व उपचाराकरीता बोईसरहून मुंबईकडे रवाना झाले. आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र ढगे यांच्या माध्यमातून रुग्ण होरायझन प्राइम हॉस्पिटल,ठाणे मध्ये दाखल झाले व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत त्यांची बायपास शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
सध्या मुंबई अहमदाबाद द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी सर्वश्रुत आहेत व ट्रेनही बंद आहेत अशातच पालघरवासीयांना होरायझन प्राइम हॉस्पिटल हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध करून देत आहेत.
फाऊंटन हॉटेल पासुन अवघ्या 8 किमी अंतरावर असलेल्या या रुग्णालयात पालघर जिल्ह्यातील गरीब-गरजू रुग्णांना या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी डॉ हृषिकेश वैद्य(फुफ्फुश विशेष तज्ञ व संस्थापक होरायझन प्राइम हॉस्पिटल)
डॉ रिया वैद्य, डॉ अवधेशप्रताप सिंह व डॉ अनंन्या जोशी (व्यवस्थापन टीम – होरायझन प्राइम हॉस्पिटल, ठाणे) प्रयत्नशील आहेत.

होरायझन प्राइम हॉस्पिटल, ठाणे यांच्या कडे महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत हृदय शस्त्रक्रिया व किडनी स्टोन(मूत खडा) शस्त्रक्रिया होत आहेत, याचा लाभ पालघर जिल्ह्यातील गरीब-गरजू रुग्णांनी करावा.

श्री- राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *