

विरार(प्रतिनिधी)- बहुजन विकास आघाडीने काही धेड़गुजरी नेत्यांना हताशी धरून वसईतील ठराविक शाळाच्या फ़ीवाढ़ीविरोधात आंदोलन करण्याची मोहीम उभारली आहे. फ़ीवाढीबाबत प्रश्न उपस्थित करणे रास्त असले तरी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी याची सुरुवात प्रथम स्वतःच्य शाळा-कॉलेजांपासून करायला हवी होती. तसे केले असते तर तो आदर्श ठरला असता; पण ठराविक शाळानाच ‘टार्गेट’ करून बहुजन विकास आघाडी धार्मिक तुष्टिकरण करत आहे; अशा शब्दात वसई भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांनी बविआला कानपिचक्या दिल्या आहेत.
लॉकडाउन काळात लोकांच्या नोकरीं गेल्या आहेत; तशाच प्रकारे बविआ नेत्यांनाही काही कामधंदे राहिलेले नाहीत. पालिकेत प्रशासकीय राजवट लागली आहे. त्यामुळे तर त्यांच्यावर अधिकच बेकारी आली आहे. या काळात करायला हवी ती कामे बविआने केलेली नाहीत. आणि त्याआधीही केलेली नव्हती.
रस्ते, पाणी, वीज याबाबतच्या सामन्य समस्या यांना सोडवता आलेल्या नाहीत. निवडणुका जवळ आल्या की; हे कामे सुरू करणार आणि आपण कामे करत असल्याचा बड़ेजाव मिरवणार, हे आता लपून राहिलेले नाही.
लॉकडाउन काळात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्याशिवाय काही एक कामे केलेली नाहीत. त्याही समस्या यांच्या आधी कोणी तरी मुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून दिलेल्या होत्या. पण निवडणूक तोंडावर असल्याने यांना क्रेडिट हवे म्हणून यांच्याकडूनही एक पत्र आणि त्याचे फ़ोटो सोशल मीडियावर व्ह्यायरल करणार. बाकी यांचे काहीही काम नाही.
आता तर धार्मिक तुष्टिकरण करण्याचा अजेंडा यांनी राबवला आहे. यासाठी काही ठराविक शाळाना फ़ी कमी करण्यासाठी टार्गेट केले जात आहे. यासाठी काही धेड़गुजरी कार्यकर्त्यांना हाताशी धरले गेले आहे. मात्र सामाजिक कामांच्या आड़ बविआने राबवलेला हा राजकीय अजेंडा लपून राहिलेला नाही.
या शाळाना फ़ी कमी करण्यास सांगण्याअगोदर याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या शाळा-कॉलेजपासून केली पाहिजे होती, अशा कठोर शब्दात तसनीफ़ शेख यांनी बविआ नेत्यांची कानउघाडणी केली आहे.