मुंबई :(विशाल मोरे)रोशनी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल आवॉर्ड कार्यक्रम रविवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी नुकताच पार पडला.यात भारताबरोबर १५ देशासह जगभरातून ६५० हुन अधिक फिल्मने सहभाग नोंदविला होता.या सर्व लघुपटामधून दिग्दर्शक शिवाजी मालवणकर निर्मित व श्री नंदा आचरेकर लिखित ‘चित्रकार’ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपट व बालकलाकार आर्यन विलास पाटील यांस सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार जाहीर झाला.यामध्ये 3000/- चेक आणि प्रमाणपत्र प्रमुख सतीश मेटे यशराज इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स सुभाष तायडे पाटील लेखक /डिरेक्टर अरुण गरुड मराठी चित्रपट निर्मिते बाबासाहेब मोराळकर संस्थापक संस्कृती गोबल इंग्लिश स्कूल सतीश तायडे मुख्याध्यापक रोशनी फिल्म फेस्टिव्हलचे आयोजक तुषार थोरात,सागर जाधव यांनी लघुपटाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी आयोजक तुषार थोरात यांनी बालकलाकार आर्यन पाटील याच्याशी संवाद साधून त्याच्या अभिनयाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.त्याला पुढील आगामी चित्रपट मध्ये संधी देण्याचे आवाहन केले आहे.
आतापर्यंत बालकलाकार आर्यन पाटील याला गेल्या सात महिन्यात 22 सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाले आहेत.तसेच तेलंगणा राज्यतर्फे घेण्यात आलेल्या महोत्सवात देखील आर्यन ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळाला.व केरळ,कोलकत्ता ,बिहार मध्ये पणआर्यन ला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाले आहेत.त्याच्या यशामध्ये त्याचे आईवडील ,हितचिंतक यांचा मोलाचा वाटा आहे.अनेक मान्यवरांनी कौतुक करून चित्रकार टीम आणि आर्यन पाटीलला खूप शुभेच्छा दिल्या.आर्यन पाटील आणि चित्रकार टीम चे जगभरातुन कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *