

प्रतिनिधी : वसई पश्चिम किनारपट्टीतील कार्यरत भिम प्रेरणा जागृती संस्था अनेक असे समाजउपयोगी उपक्रम घेत असते. सदर वह्यांची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष एँड.चेतन भोईर व पदाधिकारी यांनी दिले. नऊ गावातील वाँट्सअँप ग्रुप वर वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्षांव होत असतो संस्थे तर्फे ठरविण्यात आले की कोणाचाही वाढदिवस असल्यास त्यांनी एक वही एक पेन दयावे जेने करून गरीब गरजू विद्यार्थ्यां पर्यंत ते पोहचू शकेल सदर संकल्पनेला नऊ गावातील सर्व नागरिकांना आवडली व ज्या व्यक्तींचा वाढदिवस असला तर त्यांनी वही, पेन, पेन्सील, काँपोस असे शाळेय साहित्य विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात केली. बगता बगता नऊ गावातील सर्व विद्यार्थ्यांना पुरेल ऐवढे साहित्य संस्थे कडे जमा करण्यात आले. सर्व जमा झालेले साहित्य १ नोव्हेंबर २०२० रोजी संस्थे तर्फे नऊ गावतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची रूपरेषा वहयांची लिस्ट नुसार साहित्य व्यवस्थित रचना करने हे सर्व संस्थेचे पदाधिकारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष- एँड. चेतन भोईर, उपाध्यक्ष- भरत पाटील व रत्नाकर वागळे, सचिव-महेश जाधव, खजिनदार-देवेंद्र भालेराव, सहखजिनदार-यतिन जाधव, सल्लागार-महादेव देवराव, प्रसिद्ध प्रमुख-हरेश मोहिते, भरत भोईर, जयेश भोईर अशा अनेक कार्यकत्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.