

पालघर(प्रतिनिधी)पालघर तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र असलेले केळवे- शिरगाव पर्यंटन स्थळांचा सर्वांगीण विकास तसेच शासनाचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे आज आमदार श्रीनिवास वनगा यांनी केळवे येथील पर्यटन विकास चर्चासत्रात सांगितले.
सदर बैठकीत हॉटेल असोसिएशन केळवे,पर्यटन विकास संघ,केळवे ग्रामपंचायत, केळवे बीच असो.डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था तसेच गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व पर्यटन तसेच पूरक व्यवसाय पूर्ण पणे विस्कळीत झालेले आहे.भुमीपुत्रांना प्रचंड प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे
जैवविविधटेने नटलेल्या निसर्ग रम्य केळवे व परिसरातील पर्यटनास चालना देऊन रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे,त्यादृष्टीने पर्यटक व स्थानिक उद्योजकाशी यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यांनी सविस्तर चर्चा केली.
केळवे पर्यटनाच्या दृष्टीने पायाभूत सुविधांची उभारणी तसेच विविध इतर अॅमिनिटिजची उभारणी ,(स्क्युबा ड्राईव्हिंग,वाॅटर स्पोर्ट्स, मच्छालय,म्युझियम,नाट्यगृह) तसेच स्थानिक उत्पादनासाठी बाजार पेठ उभारणे.स्थानिक खाद्यपदार्थ,कला,वस्तू इत्यादिसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या वास्तूंची योग्य निगा आणि नियोजन, जागोजागी माहिती दर्शक फलक लावणे आदी अनेक मागण्या यावेळी हॉटेल असोसिएशनचे आशिष पाटील व ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक श्री.जयवंत चौधरी तसेच इतर हॉटेल व्यवसायिकांनी उपस्थित केल्या.
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेतर्फे केळवे रोड व डहाणू रोड स्थानकांस पर्यटन स्थानकांचा दर्जा मिळणेसाठी प्रयत्न केले जावेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.राजेशभाई शाह, उपजिल्हा प्रमुख श्री.राजेश कुठे,प.स.सदस्या श्रीमती भारती सावे,केळवे सरपंच श्रीमती भावना किणी,उपसरपंच श्री.नितीन राऊत,शिवसेना विभाग प्रमुख उमेश पालेकर,शाखाप्रमुख तुषार पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. चौधरी, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी व गावातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
दरम्यान लवकरच आपण राज्या चे पर्यटन मंत्री ना.आदित्यजी ठाकरे यांची भेट घेऊन जास्तीत जास्त विकासनिधी मिळणेसाठी प्रयत्न करू असे आमदार श्रीनिवास वनगा यांनी सांगितले.

