आपल्या उत्तम संघटन कौशल्याने कोकणातल्या जनतेची सेवा करणारे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजप प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेचे माजी आमदार संदेश कोंडविलकर (६८) यांचे नुकतेच (२९ ऑक्टोबर) निधन झाले. गेले काही दिवस कोंडविलकर हे आजारी होते. कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी विवाहित तीन मुली, जावई, भाऊ आहे. त्यांच्या पार्थिवाला त्यांचे जावई विवेक माजगांवकर यांनी अग्नी दिला.

संदेश कोंडविलकर यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’तून त्यांच्या सामाजिक कारकिर्दीला सुरुवात केली होती. भाजप पक्षाने कोकण संघटक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. त्यांनी चर्मोद्योग महामंडळाचे अध्यक्षपदही भूषविले होते.

त्यांच्या निधनाने सामाजिक राजकीय क्षेत्रातील तारा निखळल्याची भावना व्यक्त करत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी शोक व्यक्त केला. कोकणात आपल्या उत्तम संघटन कौशल्याचा उपयोग करून प्रतिकूल परिस्थितीत संघर्षातून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे काम केले. त्यांच्या जाण्याने पक्षाने एक कुशल संघटक, तळमळीचा कार्यकर्ता गमवला असून भारतीय जनता पक्षाची अपरिमित हानी झाल्याचे सुरेश प्रभू यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *