

विरार(प्रतिनिधी)-वसई-विरार महानगरपालिका अतिक्रमण विभागातील कामावरून कमी करण्यात आलेल्या १२७ कर्मचान्यांना पून्हा सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय आयुक्त गंगाथरन डी. यांनी घेतला आहे.
येत्या आठवड्यात सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.
महापालिका अतिक्रमण विभागात काम करणाऱ्या १२७ कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने १७ मे २०२० पासून
अचानक कामावरून कमी केले होते.
वसई-विरार महानगरपालिकेच्या मंजूर ठेकेदाराच्या माध्यमातून गेली १४ ते १५ वर्षापासून नियमित पालिकेच्या सेवेत काम करणाऱ्या १२७ कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी करण्यात आले होते. त्यात उद्भवलेल्या कोविड-१९च्या महामारीमुळे या मजुरांवर व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यात शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार रवींद्र फाटक यांची भेट घेऊन त्यांच्याकड़े आपली कैफियत मांडली होती.
आमदार फाटक यांनी या विषयी त्वरित आयुक्तांची भेट घेतली व आयुक्तांसोबत पत्रव्यवहार करून अतिक्रमण विभागातील १२७ कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत पुन्हा रुजु करून घ्यावे, अशी मागणी केली होती.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस नियमित काम केले
होते. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा आमदार फाटक यांनी आयुक्तांकडे व्यक्त केली होती; परंतु महापालिका प्रशासनामार्फत या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करण्याकरिता विलंब
होत असल्याने आमदार फाटक यांनी महाराष्ट्र राज्याचे नगरविकामंत्री एकनाथ शिंदे यांना या विषयी लक्ष घालून या कर्मचान्यांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील विषयाचे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयातील आपल्या दालनात या विषयी आमदार रवींद्र फाटक यांच्यासमवेत पालिका आयुक्त व इतर अधिकारी वर्ग यांची बैठक घेऊन कामावरून कमी करण्यात आलेल्या सर्व १२७ कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सेवेत रुजू करुन घेण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते.
त्यामुळे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐन दिवाळीपूर्वीच या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिल्याबद्दल आमदार फाटक यांनी
कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान; कर्मचाऱ्यांनी ही आम्हाला शिवसेनेच्या प्रयत्नांमुळेच अखेर न्याय मिळाला व ही आमच्यासाठी दिवाळीची अनमोल भेट ठरली आहे; अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.