प्रतिनिधी वसई : या दोन संस्थांनी २०१९ च्या पावसाळ्यापूर्वी प्राथमिक स्वरुपाच्या कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या स्वरुपाचा प्राथमिक अहवाल महानगरपालिकेला दिला परंतु थातुरमातुर काम करण्याशिवाय महानगरपालिकेने या अहवालाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत असा गंभीर आरोप शिवसेना उपशहर श्री मिलिंद चव्हाण यांनी केला आहे . हा अहवाल येण्यापूर्वीच तत्कालीन आयुक्त श्री सतीश लोखंडे आणि आताचे आयुक्त श्री बी जी पवार यांच्याशी संपर्क साधून नालासोपारा शहराचे सांडपाणी ज्या सोपारा खाडीतून वसई शहरात येते त्या खाडीचा मार्ग बदलून तिथे खाडीत भराव टाकून मैदान टाकले आहे हे निदर्शनास आणून दिले परंतु याबाबत महानगरपालिकेतर्फे काहीच केले गेले नाही . आता सत्यशोधन समितीचा अहवालात पान क्रमांक २१ व २२ मध्ये देखील हा जो बदलेला मार्गे पूरपरिस्थिती आमंत्रण देणारा आहे हे नमूद केले आहे आणि २०१९ च्या पावसाळ्यापूर्वी तो पाणी जाण्यासाठी पूरक करावा अशी सूचना असताना देखील महानगरपालिका झोपेचे सोंग घेत आहे कारण सदर खाडीचा मार्ग महानगरपालिका यांनी भराव टाकून खाडी बंद केली आणि तिथे अनधिकृत मैदान कोणत्या लोकप्रतिनिधीच्या सांगण्याप्रमाणे केले आणि वसईच्या जनतेला पुरात ढकलले ते महानगरपालिका आयुक्त सांगणार का आणि जो करोडो रुपये जनतेचा पैसा खर्च करून अहवाल मागवला आहे त्यावर अंमलबजावणी कोणत्या वर्षी करणार हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने फक्त गाळ काढण्याचे काम केले असून ते ही महानगरपालिका क्षेत्रात पूर्णपणे केले नसून गाळ काढून तिथेच ठेवून पुढच्या वर्षासाठी ठेकेदार यांची सोय करून ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *