

वसई : बिहारमध्ये एनडीएचा विजय झाल्यानंतर जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वसईत भाजपा कडून नागरिकांना लाडू वाटून करुन आनंद साजरा करण्यात आला. वसईतील स्टेशन येथील अंबाडी नाका येथे भाजपा कडून जल्लोष करत आनंद साजरा करण्यात आला.
भाजपाचा बिहार विधानसभा तसेच गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, झारखंड, मणिपूर व कर्नाटक येथील पोटनिवडणुकीतही तेथील जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिला.
यावेळी उत्तम कुमार यांनी बोलताना, देशाच्या जनतेने प्रत्येक वेळी भाजपाच्या बाजूने मतदान रुपी आशिर्वाद दिले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे यश भाजपा मिळाले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने सत्तेसाठी जी लाचारी केली त्याचे उत्तर शिवसेनेला देशात झालेल्या पहिल्याच निवडणुकीत दाखवून शिवसेनेला दाखवून दिले. महाराष्ट्रात केलेल्या अनैसर्गिक तिघाडी सरकारमधील काँगेसला ही बिहारच्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. माझे प्रेरणास्थान राज्याचे एकमेव यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा ला यश मिळाले आहे. कोरोनानंतर झालेल्या या पहिल्या निवडणुकीमध्ये आलेल्या यशामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये शंभर हत्तींचे बळ आहे आहे. याचा परिणाम आपल्याला येणाऱ्या वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीतही दिसेल. असे ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमास प्रदेश प्रतिनिधी शेखर धुरी, वसई रोड मंडळ अध्यक्ष रामनुजम, रमेश पांडे, गोपाळ परब, महेश सरवणकर, ज्ञानेश्वर पवार, सुद्धांशू चौबे, सुरेश देशमुख, कल्पेश चव्हाण, मार्टिव कोलासो, मयांक सेठ, गोपी मेनोन, जितू वेंगुर्लेकर, बकुल मेहता, ऋषी वोरणी तसेच महिला पदाधिकारी शैली व मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.