

वसई (प्रतिनिधी) : वसईच्या जगप्रसिद्ध मत्स्य परंपरेवर आधारित ‘वसईची मासळी’ हा गाण्यांचा अल्बम दिवाळी सणा निमित्त देशवासियांच्या भेटीला येत आहे. या अल्बमच्या माध्यमातून वसईची पारंपरिक मत्स्य परंपरा आणि संस्कृतीचे विविधांगी पैलूंचे दर्शन या गाण्यांच्या अल्बमधून देशवासियांना अनुभवता येणार आहे.अफाट पसरलेल्या अरबी समुद्राचा राजा अर्थात वसईतील कोळी बांधव. ऊन-वारा पाऊस या सर्व परिस्थितीतही दर्याराजाकडून मिळणार्या मासळीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. वसईचा कोळी बांधव अर्थात मासेमार ही वसईची जगप्रसिद्ध ओळख आहे. खायला चविष्ट असे मासे वसईच्या किनार्यावर अरबी समुद्रातून येत असतात यामुळे माशांना जगभर मागणी असते. मासेमारी व्यवसायाबरोबरच जगप्रसिद्ध कोळी नृत्य ही खरी या समाजाची आणि पर्यायाने वसईची खरी ओळख आहे. या सर्वांची नव्याने ओळख व्हावी आणि या संस्कृतीचे दर्शन घडावे याकरिता व्ही एंटरमेन्ट प्रस्तुत ‘ विजय वैती व सहकारी आणि वसई सागरी कोळी मच्छिमार सहकारी संस्था पाचुबंदर संयुक्त विद्यमाने वसईची मासळी’ हा गाण्यांचा अल्बम देशवासियांना दिवाळीची खास भेट घेऊन येत आहेत असे अल्बमचे निर्माते विजय वैती यांनी सांगितले