

नागपूर : भारतीय स्वातंत्र्यलढयाचे आदिवासी जननायक क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त आज फुटा ला तलाव चौक स्थित त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा. आमदार प्रकाश गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा. आमदार प्रकाश गजभिये म्हणाले की, आपला व आपल्या समाजाचा विकास फक्त शिक्षणानेच होउ शकतो, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, आदिवासींनी आज शिक्षित होवून शासकीय मोठया पदावर जाण्याची गरज आहे. बिरसा मुंडाने आपल्या नैसर्गिक हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकिय बदलाची प्रक्रिया होती. बिरसा मुंडाने बुध्द कधीच वाचला नाही पण बुध्दांची शिकवण त्यांच्या तत्वज्ञानात प्रखरतेने जाणवता होती. त्यांनी महात्मा फुले, कबीर वाचला नाही तरी सामाजिक, वैज्ञानिकतेचे ते प्रसारक होते. बिरसाचे प्रश्न समोर घेऊन ती प्रक्रिया समाज बदलासाठी लोकशाहीच्या धारणेवर जीवनशैली बनविली तो भारतीय क्रांतीची आधारभूमी आहे. समाज बदलाचा बिरसा मुंडा यांचा विद्रोह हा एक आदिवासींच्या पुर्ण स्वातंत्र्याचा विद्रोह होता.
सन १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक लढाया करुन त्यांना जेरीस आणले. त्यांनी पारंपारिक शस्त्रांद्वारे म्हणजे धनुष्यबाण, भाले इत्यादींच्या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढवले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.