

★ उशिरा सुचलेले शहाणपण! : उत्तम कुमार
वसई : वसईत जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली काल वसईतील सिद्धीविनायक मंदिरात भाजपाच्या आंदोलनामुळे मंदिर उघडण्याचा जो निर्णय घेण्यात आला त्याबद्दल आरती करून जल्लोष करण्यात आला. यावेळी 101 दिवे मंदिराबाहेर लावून दिव्यांची आरास करण्यात आली.
उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, ‘उशिरा सुचलेले शहाणपण!’ असा राज्य सरकार ला टोला लगावला. यापूर्वी उत्तम कुमार यांच्या नेतृत्वात वसईतील आठ मंदिरांमध्ये घंटा नाद आंदोलन करण्यात आले होते. तसेच दरम्यानच्या काळात शास्त्रीनगर येथील मंदिराबाहेर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. भाजपाच्या या यशाबद्दल त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व जनतेचे व भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमास अभय कक्कड, सिद्धेश तावडे, मार्तीव कोलासो, सुरेश देशमुख, रमेश पांडे, बाबूभाई परेडवा, गोपाळ परब, अपर्णा पाटील, श्रीकुमारी मोहन, बाळा सावंत, धर्मेश पांडियन, दिनेश मकवाना, महेश सरवणकर आदी पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात भक्त वर्ग उपस्थित होते.