

वसई – प्रतिनिधी – सद्या शिक्षण.पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहेत अशा संभ्रम अवस्थेत एखादी शिक्षण संस्था उभारणे जिकरीचे
काम आहे आणि हे जिकरीचे काम विधी घायवट यांनी केले आहे ही बाब नक्कीच कौतुकास्पद असल्याचे बोल महाराष्ट्राला परिचित असलेले ज्योतिषी डॉ. सुधाकर कुडू यांनी नुकतेच नव्याने स्थापन झालेल्या गोल अकेडमी या शैक्षणिक संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
वसई पापडी उमेला फाटा येथील राम मनोहर लोहिया नगर येथे इयत्ता 5 वी ते 12 पर्यंत शिक्षण देणाऱ्या गोल अकादमी या क्लास चा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी दैनिक आपला उपनगर च्या संपादिका अनिता घायवट, तुषार दिवाळी अंकाचे संपादक डॉ. अरुण घायवट उपसंपादिका सौ संध्या प्रमोद गायकवाड , प्र ख्यात ज्योतिषी डॉ. सुधाकर कुडू उपस्थित होते. यावेळी क्लासच्या मुख्याध्यापिका म्हणून संध्या गायकवाड यांची नेमणूक केली. या प्रसंगी उपस्थितांना शिक्षण क्षेत्रात बदल होत आहे नव्या शिक्षण पद्धती कशी आहे या बाबत विद्यार्थी, पालक आणि दस्तुरखुद्द शिक्षण संस्था देखील संभ्रमात आहेत अशा परिस्थिती क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्याना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तसेच विद्यार्थ्याना अभ्यासात येणाऱ्या अडी अडचणी सोडविणे व त्यांच्या कडून योग्य पद्धतीने अभ्यास करून घेतला जाईल अशी ग्वाही मुख्याध्यापिका संध्या गायकवाड यांनी दिली क्लास मध्ये अनुभवी आणि शिक्षण क्षेत्रातील हुशार शिक्षकांची मदत होणार आहे, अभ्यासाला पूरक साहित्य म्हणून ग्रंथालय , अभ्यासिकेची सोय , प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष , उत्तम क्लास रूम, वेळोवेळी परीक्षा, समुपदेशन आणि सर्व सामान्य पालकांना परवडेल अशी माफक फी अश्या स्वरूपाचा हा क्लास असणार असल्याची माहिती देखील नवनिर्वाचित मुख्याध्यापिका संध्या गायकवाड यांनी दिली.
