
रेल्वेतील दिव्यांग डब्यात सामान्य व्यक्तींचे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने त्याचा नाहक त्रास दिव्यांग बंधू व भगिनींना होत असून ह्या दिव्यांग डब्यात सामान्य महिलांचाही जास्त त्रास होत असून महिला पोलिस कर्मचाऱ्यांद्वारे त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही.तसेच दिव्यांग बंधू व भगिनींना दिव्यांग डब्यात चडन्यासाठी व उतरण्यासाठी त्रास होत असून कधीही दिव्यांग व्यक्तीवर जीवितहानी होऊ शकते.
दिव्यांग डब्यातील सामान्य व्यक्तींचे अतिक्रमण थांबवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास वसई तील रेल्वे स्टेशन समोर अपंग जनशक्ती संस्थेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ह्यावेळी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार व संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील बाविस्कर यांनी वसईचे रेल्वे स्टेशन मॅनेजर ला एका निवेदनाद्वारे दिला आहे.
