

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट इंडिया,(एनयुजे इंडिया)च्या वतीने एनयुजे महाराष्ट्र, अध्यक्ष शीतल करदेकर यांचेवर एनयुजेइंडिया च्या कार्यकारिणीत सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीवर एनयुजे महाराष्ट्रच्या एकूण ४जणांची निवड करण्यात आली. एनयुजे इंडिया ,नवी दिल्ली एक्झिक्युटिव मेंबर म्हणून
मा सुवर्णा दिवेकर , रायगड
मा संजना गांधी , पुणे
मा शिवाजी नलावडे, औरंगाबाद
यांची निवड करण्यात आली आहे.
एनयुजे महाराष्ट्र च्या वतीने सर्वाचे अभिनंदन!
महाराष्ट्रात युनियन बळकटीसाठी या मान्यवरांचा जास्तीत जास्त सहभाग आणि राष्ट्रीय स्तरावर उत्तम योगदान मा शिवेंद्रकुमार यांचे मार्गदर्शनाखाली लाभेल हा
विश्वास!
सीमा भोईर, वैशाली आहेर, कैलास उदमले, जिल्हाध्यक्ष, सचिव , कोषाध्यक्ष एनयुजे महाराष्ट्र चे सर्व टीमने ,
मा मार्गदर्शक ज्येष्ठ एनयुजे नेते मा शिवेंद्रकुमारजी व एनयुजे इंडियाचे अध्यक्ष मा रासबिहारीजी यांचे मनापासून आभार मानले.
या निवडीबाबत सर्व राज्यांमधून मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन होत आहे.