

ठाणे(राहुल गायकर) :मुंबईचा महाराजाधिराज व माऊली फाऊंडेशन यांच्या संयुक्त संयोजनच्या माध्यमातून
“एक घास मायेचा” या अन्नदान उपक्रमा द्वारे जमा केलेलं साहित्य गहू, तांदूळ, डाळ, पोहे, सुका खाऊ, साबण, तेल, टूथपेस्ट, ताक, लस्सी, बिस्कीट, चोकॉलेट्स आणि बरच काही आज ठाणे येऊर येथील विवेकानंद_बालक_आश्रमात देण्यात आले.
ह्या उपक्रमात हात भार लावणाऱ्या माझ्या सर्व देणगीदारांचे शतशःआभार, आपल्या मुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमात सहभागी होऊन मोलाचे सहकार्य करणाऱ्या माऊली फाऊंडेशन आणि मुंबईचा महाराजाधिराज चे स्वयंसेवक पदाधिकारी सहकाऱ्यांचे आभार या वेळी महेश ना. गिराम (माऊली फाऊंडेशन – संस्थापक/अध्यक्ष यांनी व्यक्त केले.