

भारतीय जनता पार्टी वसई शहर मंडल तर्फे महावितरण विरूद्ध व ठाकरे सरकार विरूद्ध ग्राहकांना अवाजवी वीज बील तसेच वीज दर वाढ विरूद्ध वसई पारनाका महावितरणाच्या कार्यालया समोर भारतीय जनता पार्टी जिल्हा सहकार आघाडीचे जिल्हा सह संयोजक मुकूंद मुळ्ये यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले… अव्वाच्या सव्वा लावलेली बिले व एप्रिल महिन्यात वाढवलेली वीज दरवाढ या विरूद्ध वीज बील जाळून सरकारचा निषेध केला.व तात्काळ वीज बील माफ करावे अशी मागणी या आंदोलनाचे आयोजक भाजपा वसई शहर अध्यक्ष सचिन परेरा यांनी पत्र देऊन मागणी केली . तसेच वसई भाजप सरचीटणीस अमित पवार , भाजपा वसई शहर महिला मोर्चा अध्यक्ष रेश्मा निषाद ,भाजपा जिल्हा चिटणीस प्रतिक चौधरी , भाजपा वसई शहर युवा अध्यक्ष विशाल पाटील , सना थारा, चेतन वर्शीकर , सतिश जठानी , हेमंत राजगोर , हितेश राऊत, संकल्प राऊत , नरेश पाटील , शकील थारा , मनमीत राऊत , असंख्य कार्यकर्ते व वसईची जनता उपस्थित होती.
